नमस्कार,
आमचा पाल्य तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयात शिकत आहे. शाळेत चालणारे उपक्रम तसेच शाळेची कार्यपद्धती अतिशय प्रशंसनीय आहेत. प्रार्थनेसह होणारा परिपाठ, दिनविशेष विद्यार्थ्यांना पर्यावरण, थोर व्यक्ती, याविषयी अवगत करवितात. शाळेत सतत होणारे वक्तृत्व, भारतीय हिंदू सण परंपरा यांनी विद्यार्थ्यांना आपला अलौकिक देश, महान संस्कृती, उज
नमस्कार,
आमचा पाल्य तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयात शिकत आहे. शाळेत चालणारे उपक्रम तसेच शाळेची कार्यपद्धती अतिशय प्रशंसनीय आहेत. प्रार्थनेसह होणारा परिपाठ, दिनविशेष विद्यार्थ्यांना पर्यावरण, थोर व्यक्ती, याविषयी अवगत करवितात. शाळेत सतत होणारे वक्तृत्व, भारतीय हिंदू सण परंपरा यांनी विद्यार्थ्यांना आपला अलौकिक देश, महान संस्कृती, उज्ज्वल परंपरा आणि दिव्य वारसा यांचे ज्ञान होते. वेळोवेळी समाजातील यशस्वी तसेच विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्व यांचे शाळेतील व्याख्याने, मार्गदर्शन, मुलाखत्ती विद्यार्थ्यांना भविष्यातील त्यांची जडणघडण होण्यासाठी प्रेरक ठरतात.
. शाळेतील संगीत, नाट्यछटा इ. स्पर्धा/कार्यक्रमांमुळे त्यांच्यातील सुप्त कलाकारास साद घातली जाते. या सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे आदर्श शिक्षकवृंद! त्यांचे शालेय शिक्षणासोबतच या क्रियाकलापांमुळे विद्यार्थी आज अग्रेसर ठरत आहेत.
आपणा सर्व शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थेच्या विश्वस्ताना मनापासून धन्यवाद!
माझी मुलगी कु. अवंती कोष्टी. इयत्ता ९वी त आहे. आम्हाला शाळेतीलशिस्त, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थी च्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे उपक्रम खूप आवडतात शाळेमुळे आमच्या मुलांन मध्ये ज्ञानाबरोबर संस्कार, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होत आहे. त्यामुळे मी शाळेच्या कामकाजाबद्दल पूर्ण पणे समाधानी आहे.
शाळा विद्यार्थी च्या सर्वांगीण
माझी मुलगी कु. अवंती कोष्टी. इयत्ता ९वी त आहे. आम्हाला शाळेतीलशिस्त, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थी च्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे उपक्रम खूप आवडतात शाळेमुळे आमच्या मुलांन मध्ये ज्ञानाबरोबर संस्कार, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होत आहे. त्यामुळे मी शाळेच्या कामकाजाबद्दल पूर्ण पणे समाधानी आहे.
शाळा विद्यार्थी च्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे शिक्षकवर्ग प्रेमळ, मेहनती व जबाबदार असून ते मुलांना योग्य मार्गदर्शन करतात.
शाळेच्या कार्याबद्दल आम्ही मनापासून कौतुक करतो.
गुरुकुल शाळा ही अतिशय छान आहे. शिकवण्यातही छान येते. संपूर्ण शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनही करतात अतिशय शिस्तप्रिय अशी शाळा आहे. विविध प्रकल्प देण्यात येतात व ते पूर्णही करून घेतात. तसेच परीक्षाही अजून थोडी कडक घेण्यात यावी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवावेत. जेणेकरून मुलांना अजून प्रोत्साहन मिळेल जसे की आनंद मेळावा, विविध स्पर्धा घेण्यात याव्यात. धन्यवाद
शाळेबद्दल एक पालक म्हणून बोलायचे झाले तर मला शाळेची शिस्त खूप चांगली वाटते. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगली शिस्त लावणे आणि चांगले संस्कार देणे व याच बरोबर चांगले शिक्षण देणे हे खूप महत्त्वाचे असते आणि हे सर्व गुरुकुल संस्था बऱ्याच वर्षापासून देत आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात
शाळेबद्दल एक पालक म्हणून बोलायचे झाले तर मला शाळेची शिस्त खूप चांगली वाटते. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगली शिस्त लावणे आणि चांगले संस्कार देणे व याच बरोबर चांगले शिक्षण देणे हे खूप महत्त्वाचे असते आणि हे सर्व गुरुकुल संस्था बऱ्याच वर्षापासून देत आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात व काही प्रमाणात त्यात पालकांनाही सहभागी केले जाते यामुळे पालकांचाही शिक्षकांशी संपर्क राहतो व आपल्या पाल्याची प्रगती वेळोवेळी कळत राहते . या शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय , संगणक कक्ष, सायन्स लॅब , लॅंग्वेज लॅब ही उपलब्ध आहे व याचा वापर विद्यार्थी योग्य पद्धतीने करतात यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. शाळेत वेगवेगळ्या स्पर्धाही विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातात. क्रीडा क्षेत्रातही शाळेचा उत्तम सहभाग आहे. एक पालक म्हणून ही शाळा मला नेहमी आदर्श शाळा वाटते.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.