
गुरुकुल ट्रस्ट संचलित, हरणाताई जोशी प्राथमिक विद्यालय, चाळीसगाव ही शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण ज्ञान देणारे प्रतिष्ठित विद्यालय आहे. सन १९८४ मध्ये सुरू झालेल्या या शाळेने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे.
शाळेची सुरुवात अत्यंत साध्या परिस्थितीत तट्ट्यांच्या भिंती सुरू झाली. परंतु संस्थेच्या आदरणीय विश्वस्तांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, शिक्षकांचे परिश्रम आणि पालकांचा विश्वास यामुळे आज ही शाळा परिसरातील एक आदर्श आणि प्रगतिशील शिक्षणसंस्था म्हणून ओळखली जाते.
शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, संस्कार, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्यावर शाळेचा विशेष भर आहे.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम संस्कार आणि आधुनिक ज्ञान देऊन त्यांना जबाबदार, सुसंस्कृत आणि आत्मविश्वासू नागरिक घडवणे.
▪ विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य यांचा विकास करणे.
▪ आधुनिक शिक्षणपद्धती आणि उपक्रमांद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे.
▪ सांस्कृतिक, क्रीडा आणि वैज्ञानिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे.
▪ विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करणे.


We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.